गुड न्यूज! ‘लाडकी बहीण योजनेच्या 10 व्या हप्त्यासाठी शासन निर्णय [GR]₹2,511 कोटी निधी मंजूर
महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट ₹1,500 त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. या योजनेच्या 2025-26 आर्थिक वर्षासाठी ₹2,511 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना – योजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकेला बळकटी देणे हा आहे. राज्य शासनाने ही योजना विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी सुरू केली आहे.
पात्रता आणि लाभ
सदर योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील खालील प्रकारातील पात्र महिलांना लाभ दिला जातो:
- विवाहित महिला
- विधवा
- घटस्फोटित
- परित्यक्ता
- निराधार महिला
- तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला
या सर्व पात्र महिलांना दरमहा थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ₹1,500 जमा केले जातात. लाभ Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने दिला जातो.
आर्थिक तरतूद व निधी वितरण
सन 2025-26 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी एकूण ₹2,829 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ₹2,511 कोटी रुपये सर्वसामान्य घटकातील लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
हप्त्यांची माहिती व पुढील टप्पा
योजनेअंतर्गत दहाव्या हप्त्याची तारीख लवकरच जाहीर होणार असून, एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
शासन निर्णय
शासन निर्णय डाउनलोड करा
अधिकृत शासन निर्णय व संपूर्ण तपशीलासाठी लिंकवरून शासन आदेश डाउनलोड करता येईल.