महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2,795 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2,795 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer – LDO) पदासाठी 2795 रिक्त जागांची महाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-अ संवर्गात केली जात आहे.

अर्ज करण्याची महत्त्वाची माहिती

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 29 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 19 मे 2025
  • अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: https://mpsconline.gov.in/candidate

भरतीचा तपशील

  • पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer)
  • एकूण पदसंख्या: 2795
  • सेवा वर्ग: महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता

  • पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयात पदवी आवश्यक आहे.
  • भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा, 1984 अंतर्गत नोंदणी अनिवार्य आहे.

वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी)

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ: 18 ते 43 वर्षे (5 वर्षांची सूट)

अर्ज शुल्क

  • सामान्य प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग: ₹294/-

निवड प्रक्रिया

  • स्क्रीनिंग टेस्ट (लिखित परीक्षा)
  • मुलाखत

वेतनश्रेणी

  • ₹56,100 ते ₹1,77,500 (स्तर S-20, 7वा वेतन आयोगानुसार)

आरक्षणानुसार पदवाटप (एकूण 2795 पदे)

प्रवर्गपदसंख्या
अनुसूचित जाती (SC)376
अनुसूचित जमाती (ST)196
विमुक्त जाती (VJ-A)79
भटक्या जमाती (NT-B)68
भटक्या जमाती (NT-C)93
भटक्या जमाती (NT-D)63
इतर मागासवर्गीय (OBC)535
विशेष मागासवर्गीय (SBC)54
सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (SEBC)280
आर्थिक दुर्बल घटक (EWS)282
एकूण आरक्षित पदे2026
सर्वसाधारण (Open)769
एकूण2795

अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

  • लिखित परीक्षा: 90 मिनिटे, वस्तुनिष्ठ प्रश्न
  • विषय: पशुवैद्यकीय विज्ञान, पशुसंवर्धन, सामान्य ज्ञान इत्यादी
  • मुलाखत: लिखित परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांसाठी

🔗 उपयुक्त दुवे

Leave a Comment