Bribe viral video : ५०० रुपये द्या अजून’, लाचखोर ग्रामसेवकाचा व्हिडीओ समोर

‘५०० रुपये द्या अजून’, लाचखोर ग्रामसेवकाचा व्हिडीओ समोर

राज्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्पष्टपणे “५०० रुपये द्या अजून” असे म्हणताना दिसतो.

गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) राज्यभरात सक्रिय झाला असून विविध जिल्ह्यांत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये घडलेली ही घटना अधिकच गंभीर मानली जात आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातील काही कागदपत्रांसाठी ग्रामस्थांकडून सरळसरळ पैसे मागितले जात असल्याचे या व्हिडीओमधून समोर आले आहे. संबंधित ग्रामसेवक व्हिडीओत म्हणतो, “पैसे उसने घ्या, पण आम्हाला द्या,” असा दबाव ग्रामस्थांवर टाकला जात होता.

सदर घटना प्रशासनाच्या अपारदर्शक कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शासनाकडून निधी उपलब्ध असूनही गावकऱ्यांकडून व्यक्तिगत स्वरूपात पैसे मागणे म्हणजे प्रशासकीय कामकाजाचा बुरखा फाडल्यासारखे आहे.

संतप्त ग्रामस्थांनी सदर ग्रामसेवकाचा व्हिडीओ चित्रीत केला.

Leave a Comment