पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता या दिवशी मिळणार; तारीख फिक्स
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हफ्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सध्या शेतकरी २० व्या हफ्त्याची प्रतिक्षा करत आहेत.
थेट बँक खात्यात रक्कम जमा
पीएम किसान योजनेत मिळणारी आर्थिक मदत DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना रक्कम वेळेत मिळते.
राज्य शासनाची नमो शेतकरी योजना
या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.
20 वा हफ्ता जून 2025 मध्ये
पीएम किसान सन्मान निधीचे १९ हफ्ते आतापर्यंत वितरित झाले आहेत. आता २० वा हफ्ता येत्या जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष सध्या याच कडे लागलेले आहे.
लाभार्थ्यांची संख्या वाढणार
या योजनेमध्ये नुकतेच अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, नवीन ५० हजार लाभार्थ्यांची नोंद यादीत होणार आहे. यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून निधी देखील वाढवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील लाभार्थी संख्या
सध्या महाराष्ट्र राज्यात पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 92.89 लाख आहे. भूमी अभिलेख, eKYC आणि आधार संलग्न बँक खात्यांमुळे ही संख्या वाढत आहे.
लाभ बंद झाल्यास काय करावे?
काही शेतकऱ्यांना काही हफ्ते मिळाल्यानंतर पुढील हफ्ते बंद झाल्याचे आढळून आले आहे. अशा लाभार्थ्यांनी योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपले हप्त्यांचे स्टेट्स तपासावे. हफ्ता बंद झाल्यास त्याचे कारणही ऑनलाईन कळू शकते.
स्टेट्स तपासण्याची प्रक्रिया
- पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://pmkisan.gov.in
- ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.
- राज्य, जिल्हा, तालुका (गट), आणि गाव निवडा.
- ‘Get Report’ या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला किती हफ्ते मिळाले, ते सविस्तर दिसेल.
पात्र असतानाही लाभ न मिळाल्यास?
जर एखादा शेतकरी पात्र असूनही लाभ मिळत नसेल, तर त्याने तात्काळ पीएम किसान पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. यासाठी आधार क्रमांक, बँक खाते तपशील, आणि भू-संपत्तीची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.