लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा ₹1500 हप्ता या तारखेला जमा होणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. मात्र, मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
हप्त्याच्या वाटपासाठी निधी वळवला
राज्य सरकारने आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाकडून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल, अशी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना – सुरुवात आणि उद्देश
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली होती. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजतागायत त्या घोषणेला अंमलबजावणी मिळालेली नाही.