Ajit Pawar Big Update on Ladki Bahin Yojana
सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे की काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना मागील वर्षी जून महिन्यात सुरू करण्यात आली होती. यामध्ये ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये बँक खात्यात जमा केले जात आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने या भत्त्यात वाढ करून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतरही २१०० रुपये देण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
दरम्यान, विरोधकांनी सरकारवर आरोप केला की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे आणि ही योजना सरकार लवकरच बंद करू शकते. यावर अजित पवार यांनी रत्नागिरी येथे बोलताना स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्राचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबवला जाणार नाही.
लाडकी बहीण योजना ही सरकारकडून महिलांना दिलेली भाऊबीज व रक्षाबंधनाची भेट असल्याचे त्यांनी नमूद केले आणि ही योजना सुरूच राहील असेही ठामपणे सांगितले. मात्र, एक महत्त्वाचा निर्णय घेताना त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांना आधीपासून इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराची स्थिती तपासली जाईल.