Bhunaksha : तुमचे शेत, घर प्लॉट चा नकाशा पहा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटात
Bhunaksha : आजच्या डिजिटल युगात शेत, घर किंवा प्लॉटचा नकाशा पाहणे आता अतिशय सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाने भू-नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे, त्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांत फेऱ्या न मारता मोबाईलवरच आपली मालमत्ता पाहण्याची मुभा मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांत, मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने जिल्हा, तालुका, गाव व गट क्रमांक भरून जमिनीचा अधिकृत नकाशा पाहता व डाउनलोड करता येतो. या सुविधेमुळे वेळेची बचत होऊन काम अधिक पारदर्शक व सोयीचे झाले आहे.
महाराष्ट्र भू नकाशा मोबाईलवर पाहण्याची स्टेप्स Bhunaksha
- वेबसाईटला जा
https://bhunaksha.mahabhumi.gov.in
(ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत भू-नकाशा वेबसाइट आहे.)
- माहिती भराः
वेबसाईट उघडल्यानंतरः
. जिल्हा निवडा
तालुका निवडा
. गावाचे नाव निवडा
गट क्रमांक / सर्वे नंबर भरा
- नकाशा पाहाः
माहिती भरल्यावर तुमचं प्लॉटचं लोकेशन नकाशावर दाखवले जाईल.
तुम्ही त्या नकाशावर क्लिक करून संपूर्ण माहिती व नकाशा पाहू शकता.
- डाउनलोड / प्रिंट:
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही PDF स्वरूपात नकाशा डाउनलोड करू शकता.
प्रिंटआउटही घेऊ शकता.
वेबसाईट उघडा
जिल्हा, तालुका, गाव निवडा
गट क्रमांक टाका
नकाशा बघा आणि हवा तर सेव्ह करा !
लक्षात ठेवाः
मोबाईलवर ब्राउझर (Chrome, Safari वगैरे) वापरा.
इंटरनेट चांगलं असावं.
काही वेळा सर्व्हर जास्त बिझी असतो, थोडं वेळाने पुन्हा प्रयत्न करा.