CBSE 10वी आणि 12वी निकाल आज जाहीर होणार का? जाणून घ्या अपडेट
CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा सुमारे 40 लाख विद्यार्थ्यांना आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार निकाल आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, CBSE बोर्डाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, आज निकाल जाहीर केला जाणार नाही. सध्या निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल.
CBSE निकाल कधी लागणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, CBSE 10वी आणि 12वीचा निकाल 10 मेपूर्वी जाहीर केला जाऊ शकतो. काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात आहे की, 12वीचा निकाल 10वीच्या आधी येऊ शकतो. परंतु दोन्ही निकाल एकाच वेळी जाहीर होण्याची अधिक शक्यता आहे. मागील वर्षी निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
CBSE बोर्डाचा निकाल कसा पाहायचा?
येथे पहा निकाल
विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जावे लागेल. होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल. येथे आपला रोल नंबर व इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. माहिती सबमिट केल्यानंतर स्क्रिनवर मार्कशीट दिसेल, ती डाउनलोड करून सेव्ह करता येईल.
डिजिलॉकरवरून निकाल पाहण्याची प्रक्रिया
CBSE चा निकाल डिजिलॉकरवरसुद्धा पाहता येईल. त्यासाठी डिजिलॉकरच्या वेबसाइटवर जा. तिथे शाळेकडून मिळालेला 6 अंकी अॅक्सेस कोड, शाळा कोड व परीक्षा रोल नंबर टाका. त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय करून OTP टाका. लॉगिन झाल्यावर “Issued Documents” विभागात जा आणि CBSE 10वी/12वी स्कोअरकार्ड निवडून PDF डाउनलोड करा.
निकालात पास होण्यासाठी किती गुण लागतात?
CBSE बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 33% गुण मिळवणे आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत नापास झाला, तर त्याला कंपार्टमेंट परीक्षेत बसण्याची संधी मिळते. ही परीक्षा उत्तीर्ण करून वर्ष वाचवता येते. मात्र, दोनपेक्षा अधिक विषयांत नापास झाल्यास विद्यार्थ्याला त्या इयत्तेत परत शिकावे लागते.