Mahajyoti Tab Registration 2025-27: अर्ज करा
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या वतीने 2025-27 साठी मोफत टॅब्लेट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET पूर्वतयारीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
योजनेचा उद्देश व फायदे
महाज्योती मार्फत इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJ/NT), तसेच विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना 2025-27 बॅचसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, टॅबलेट व दररोज 6 GB इंटरनेट डेटा दिला जाईल.
पात्रता (Eligibility)
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी OBC, VJ/NT, SBC प्रवर्गातील असावा.
- नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील विद्यार्थीच पात्र ठरतील.
- सन 2025 मध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- विज्ञान शाखेत 11 वीमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 70% गुण आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (दोन्ही बाजूंनी)
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- इयत्ता 10 वीची गुणपत्रिका
- 11 वी विज्ञान शाखेतील प्रवेशाचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेश पावती)
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास प्रमाणपत्र
सामाजिक व समांतर आरक्षण
प्रवर्ग | टक्केवारी |
---|---|
इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
विमुक्त जाती अ (VJ-A) | 10% |
भटक्या जमाती ब (NT-B) | 8% |
भटक्या जमाती क (NT-C) | 11% |
भटक्या जमाती ड (NT-D) | 6% |
विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6% |
समांतर आरक्षण
- महिलांसाठी – 30%
- दिव्यांग – 4%
- अनाथ – 1%
अर्ज कसा करावा
- महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- “Notice Board” मधील “Application for JEE/NEET/MHT-CET-Batch-2025-27 Training” या लिंकवर क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज भरा व आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीसह असावीत.
महत्त्वाच्या तारखा व सूचना
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 मे 2025
- ई-मेल किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- जाहिरात, निवड प्रक्रिया, मुदतवाढ याबाबतचे सर्व अधिकार महाज्योती नागपूरच्या संचालकांकडे राहतील.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
संपर्क
काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा:
महाज्योती कॉल सेंटर – 0712-2870120/21