सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

आज १ मे २०२५ रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून १० ग्रॅममागे सुमारे २३०० रुपयांची घट झाली आहे. काल अक्षयतृतीयेनिमित्त सोन्याची खरेदी नेहमीपेक्षा कमी झाली होती, कारण त्यावेळी सोन्याचे दर खूपच जास्त होते. आज, या सणाच्या दुसऱ्या दिवशी, दरांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. २२ एप्रिल रोजी सोन्याने १,००,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता, परंतु त्यानंतर सतत दरांमध्ये सुधारणा (करेक्शन) पाहायला मिळत आहे. सध्याच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे की ही घसरण किती काळ टिकेल?

आजचे सोन्याचे दर (१ मे २०२५)

गुरुवार १ मे रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोनं ८७,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोनं ९५,८८० रुपये दराने विकले जात आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

चांदीचे दरही खाली

आज चांदीचा दर देखील घसरून ९९,९०० रुपये प्रति किलो झाला आहे. बराच काळ एक लाखाच्या पातळीवर असलेली चांदी आता पुन्हा त्या खाली आली आहे.

सोन्याच्या किंमती कशामुळे ठरतात?

भारतामध्ये सोन्याचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत, सरकारचे कर, आणि स्थानिक मागणी यांचा समावेश होतो. भारतात सोनं केवळ गुंतवणुकीचे साधन नसून, परंपरा, सण-उत्सव आणि लग्नसराईमध्ये याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अशा वेळी मागणी वाढल्यास दरातही चढ-उतार पाहायला मिळतो.

Leave a Comment