Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
आज १९ मे रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत होती, मात्र आज त्यामध्ये चांगलीच झेप पाहायला मिळाली आहे. सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक महत्वाची अपडेट आहे.
एमसीएक्सवरील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम सुमारे ७२४ रुपयांची वाढ झाली आहे. आज सकाळी १०.१६ वाजता ही वाढ नोंदवण्यात आली.
सोन्याचा आजचा दर
१९ मे रोजी सकाळी १०.१८ वाजता १० ग्रॅम सोन्याची किंमत ९३,०२४ रुपये इतकी झाली. याआधी सोन्याने प्रति १० ग्रॅम ९२,८०० रुपयांवर पोहोचून नीचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याचा दर वाढत जाऊन ९३,१९६ रुपयांवर पोहोचला आणि नवीन उच्चांक नोंदवला.
१६ मे रोजीचा दर
१६ मे रोजी, म्हणजेच शुक्रवारी सकाळी ९.४२ वाजता, एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,८५९ रुपये इतकी होती. त्या तुलनेत आजच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर १ किलो चांदीची किंमत ९५,४९९ रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. याआधी चांदीने प्रति किलो ९५,६४० रुपयांचा उच्चांक गाठला होता.