महाराष्ट्र SSC निकाल 2025: उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, कसा पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दहावीचा निकाल उद्या, 13 मे 2025 रोजी, दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. यावर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, राज्यातील २३,४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
निकालाची प्रतीक्षा आता संपली असून, विद्यार्थी आणि पालक निकाल पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. बोर्डाने अधिकृतपणे याबाबत माहिती दिली असून, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या शाळांमध्ये वितरित केली जाईल.
निकाल कसा पाहाल?
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवरून निकाल पाहता येईल:
निकाल पाहण्याची प्रक्रिया (ऑनलाइन):
- वरीलपैकी कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर जा.
- मुख्यपृष्ठावर “Maharashtra SSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
- आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
- निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा व भविष्यासाठी डाउनलोड किंवा प्रिंट करून ठेवा.
एसएमएसद्वारे निकाल कसा पाहाल?
जर वेबसाइट काम करत नसेल, तर एसएमएसद्वारे निकाल पाहण्यासाठी पुढील पद्धत वापरू शकता:
- आपल्या मोबाइलच्या SMS अॅपमध्ये जा.
- टाइप करा: MHSSC
- हा संदेश पाठवा 57766 या क्रमांकावर.
- काही क्षणातच आपल्या मोबाईलवर निकाल मिळेल.
महत्त्वाचे तपशील
- मंडळाचे नाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
- इयत्ता: १०वी (SSC)
- निकालाची वेळ: 13 मे 2025, दुपारी 1 वाजता
- आवश्यक तपशील: रोल नंबर व आईचे नाव
- निकाल उपलब्ध असलेली संकेतस्थळे: mahresult.nic.in, mahahsscboard.in इत्यादी