हवामान विभागाचा इशारा : पुढील 4 तास वीज, वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाचा इशारा: पुढील 4 तास वीज, वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून, सध्या राज्यातील काही भाग उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा तसेच कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी आणि आसपासच्या भागांचा समावेश आहे. पुढील 3 ते 4 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात अंदाजे दीड किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांमुळे हवामानात हा बदल होत आहे. या प्रभावामुळे विदर्भ वगळता महाराष्ट्रातील अनेक भागांत ताशी 45 ते 50 किमी वेगाने उत्तरेकडून येणारे दमट वारे वाहत आहेत.

अवकाळी पावसाचा फटका – शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या शेतकरी खरीप हंगामासाठी तयारी करत असताना अवकाळी पावसामुळे हरभरा, मका, गहू यांसारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर लावलेला उन्हाळी कांदा देखील सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून, त्यामुळे वातावरणात बदल झाला आहे.

किनारपट्टीला वादळी पावसाचा तडाखा

पश्चिम किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार समुदायाला मोठा फटका बसला असून, डहाणू आणि पालघर भागातील अंदाजे 40 ते 45 बोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.

Leave a Comment