पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२५
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत “पवित्र प्रणाली” अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदभरती (टप्पा – २) जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखत न घेता थेट निवडीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.
एकंदर तपशील
संस्था: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
पदाचे नाव: शिक्षक
एकूण जागा: ५२
नोकरीचे ठिकाण: पुणे
शैक्षणिक पात्रता
- इयत्ता १ ते ५ साठी:
उमेदवाराने संबंधित पदासाठी TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. - इयत्ता ६ ते ८ साठी:
- सामाजिक शास्त्र: TET/CTET (Paper-2) सामाजिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक.
- विज्ञान / गणित / गणित-विज्ञान: TET/CTET (Paper-2) गणित-विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक.
- भाषा विषय: TET/CTET (Paper-2) मध्ये गणित-विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र विषय असणे आवश्यक आहे.
TAIT परीक्षा 2022:
सर्व उमेदवारांनी TAIT 2022 परीक्षेस पात्रता म्हणून प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
वेतन
- Under Graduate Teacher (UGT) – इयत्ता १ ते ५: ₹16,000/- प्रतिमाह
- Graduate Teacher (GT) – इयत्ता ६ ते ८: ₹16,000/- प्रतिमाह
वयोमर्यादा
- किमान वय: १८ वर्षे
- कमाल वय: ४३ वर्षे
अर्ज पद्धत
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्ज सुरु होण्याची तारीख: ०१ मे २०२५
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी “पवित्र प्रणाली”च्या अधिकृत संकेतस्थळावर https://tait2022.mahateacherrecruitment.org.in आपली वैयक्तिक माहिती नोंदवावी व ती स्वप्रमाणित करावी.
- अर्ज सादर करण्यापूर्वी “उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” व शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावेत.
ही भरती शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम आणि सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी सर्व अटी व शर्ती पूर्ण करून विहित कालावधीत अर्ज करावा.