PM Kisan 20th installment : या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये

PM Kisan 20th installment : या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये

केंद्र सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित केल्यानंतर आता 20व्या हप्त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. या हप्त्यासाठी सरकारने आर्थिक अंदाजपत्रकावर काम सुरू केले आहे.

योजनेनुसार, पुढील हप्ता 19व्या हप्त्यापासून चार महिन्यांनी वितरित केला जातो. सध्या 19व्या हप्त्याला तीन महिने पूर्ण झाले आहेत, त्यामुळे 20व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते. योजनेचे लाभार्थी शेतकरी आगामी हप्त्यासाठी उत्साहित आहेत.

20वा हप्ता: काय मिळणार आणि कोणाला मिळणार

पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यात पूर्वीप्रमाणेच 2000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. हा हप्ता वर्ष 2025 मधील दुसरा हप्ता असणार असून देशातील 10 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सोशल मीडियावर असा अंदाज वर्तवला जात आहे की, या वेळी हप्त्याची रक्कम 4000 रुपये होऊ शकते, कारण काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी मुळे किंवा शेतकरी बांधवांनी दिलेल्या अपुऱ्या कागदपत्रामुळे मागील 19वा हप्ता मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळू शकतात.

कोणते शेतकरी पात्र असतील?

  • फक्त तेच शेतकरी ज्यांना मागील हप्त्याचा लाभ मिळाला आहे.
  • केवायसी पूर्ण असलेले शेतकरीच लाभार्थी ठरतील.
  • शेतकऱ्यांची ओळख फॉर्मर आयडी कार्डच्या आधारे निश्चित केली जाईल.
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) सक्रिय असणे आवश्यक आहे.
  • अधिक जमिन असलेल्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जाईल.

20वा हप्ता केव्हा मिळेल?

सरकारी नियमानुसार, प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो. फेब्रुवारीमध्ये 19वा हप्ता मिळाल्यानंतर, 20वा हप्ता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो. सरकारद्वारे हप्ता वितरित होण्यापूर्वी अचूक तारीख जाहीर केली जाईल.

बेनिफिशियरी लिस्ट तपासणे का गरजेचे आहे?

हप्ता देण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी (बेनिफिशियरी लिस्ट) अपडेट केली जाते. म्हणूनच शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव आहे की नाही ते नक्की तपासावे.

पीएम किसान योजनेच्या मुख्य वैशिष्ट्ये

  • ही राष्ट्रीय स्तरावर चालवली जाणारी योजना आहे.
  • 2019 पासून ही योजना सुरू असून आतापर्यंत 10 कोटींहून अधिक शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत.
  • दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात.
  • या योजनेचा मुख्य उद्देश अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.

किस्त स्टेटस कसे तपासाल?

  1. PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  2. ‘चेक योर बेनिफिशियरी स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. आपला रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा मोबाइल नंबर आणि कॅप्चा टाका.
  4. ओटीपी व्हेरिफाय करा.
  5. आपला हप्ता स्टेटस स्क्रीनवर दाखवला जाईल.

Leave a Comment