Rain Alert : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

Rain Alert : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असली तरी अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज (ता. १४) राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत आणि विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, ज्यामुळे हवामान पावसाला पोषक ठरत आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धुळे तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, नांदेड, परभणी आणि विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. अकोला व गडचिरोली येथे राज्यातील उच्चांकी ४०.६ अंश तापमान नोंदले गेले. उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील सर्वाधिक ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान अलर्ट

अलर्ट प्रकारजिल्हे
ऑरेंज अलर्ट (जोरदार वादळी पावसाची शक्यता)बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर
येलो अलर्ट (वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता)ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

Leave a Comment