राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर : महागाई भत्त्यात वाढ, वित्त विभागाकडून GR जाहीर

राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर : महागाई भत्त्यात वाढ, वित्त विभागाकडून GR जाहीर

केंद्र सरकारने दिनांक 01 जानेवारी 2025 पासून महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) 2 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर, देशातील विविध राज्य सरकारांनीही आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी DA वाढ लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर DA मध्ये 2% वाढ

केंद्र सरकारने 01.01.2025 पासून DA मध्ये 2 टक्क्यांची वाढ करत एकूण महागाई भत्ता 53% वरून 55% केला आहे. या निर्णयानंतर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांनी केंद्राच्या निर्णयाला अनुसरून राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील DA वाढ लागू केली आहे.

मध्य प्रदेश सरकारचा निर्णय

मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा. महेन यादव यांनी आपल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना DA वाढ देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. याअंतर्गत, मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांना पूर्वी 50% दराने महागाई भत्ता दिला जात होता, जो आता वाढवून 55% करण्यात आला आहे. या निर्णयाबाबत वित्त विभागामार्फत अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे काय?

महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी, पात्र इतर कर्मचारी व पेन्शनधारकांना देखील केंद्र सरकारच्या धर्तीवर 2 टक्क्यांची DA वाढ मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत भारत–पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य तणावामुळे राज्य सरकारकडून याबाबतचा निर्णय रखडल्याचे वृत्त समोर आले आहे.

कधी मिळणार वाढीव DA?

राज्य सरकारने जरी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी विश्वसनीय सूत्रांनुसार जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेल्या DA वाढीचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे संकेत आहेत. लवकरच याबाबतचा GR जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment