Weather alert : पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, राज्यातील या जिल्ह्यांना सावधेनतेचा इशारा
राज्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अनुभव येत आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठीही विविध जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स जारी केले आहेत. २४ मे रोजी महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती खालीलप्रमाणे राहील.
कोकण विभाग
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर (अहिल्यानगर) या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट भागामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्याला विशेषतः ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला असून, हे सत्र पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.