Ladki Bahin Yojana 10th Installment : महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिलं जातं. आतापर्यंत ९ हप्त्यांमध्ये २ कोटी ४१ लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
दहाव्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती
सध्या महिलांना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मिळण्याची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून, सरकारने हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या २४ तासांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
कोणत्या महिलांना मिळणार ₹4500 रुपये?
मागील महिन्यात (मार्च) महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी व मार्चचे हप्ते एकत्र म्हणजे ₹3000 जमा करण्यात आले होते. परंतु काही महिलांना मार्चमध्ये कोणताही हप्ता मिळालेला नव्हता. अशा महिलांना आता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांचे एकत्रित ₹4500 रुपये मिळणार आहेत.
योजनेची संक्षिप्त माहिती (तक्त्यासह)
बाब | माहिती |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
सुरुवात दिनांक | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील महिलां |
आर्थिक सहाय्य | ₹1500 प्रतिमाह |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
सध्याचा हप्ता | एप्रिल महिना – दहावा हप्ता |
हप्ता स्थिती तपासण्यासाठी लिंक | [Click Here] |
हेल्पलाईन क्रमांक | 181 |
जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल, तर तुमच्या खात्यात ₹4500 जमा होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइट किंवा संबंधित कार्यालयामार्फत तुमचा पेमेंट स्टेटस तात्काळ तपासा.