SSC Result 2025 : 10वी चा निकाल या दिवशी लागणार, तारीख आली समोर?

SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर झाला आहे. फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीत बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

10वी निकाल 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. अंदाजानुसार, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी 2024 मध्ये बारावीचे निकाल 21 मे रोजी आणि दहावीचे निकाल 27 मे रोजी लागले होते. त्यामुळे यंदा दोन्ही निकाल लवकर जाहीर होत असल्याचे दिसून येते.

दहावी निकालाची तारीख जाहीर होण्याची प्रक्रिया

बारावी निकालाची तारीख 4 मे रोजी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर लगेचच 5 मे रोजी निकाल प्रसिद्ध झाला. त्याच धर्तीवर, 10वी निकालाची तारीखदेखील निकालाच्या आदल्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सतत अधिकृत वेबसाइट्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे

दहावीचा निकाल खालील संकेतस्थळांवर पाहता येईल:

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://mahahsscboard.in
  3. http://hscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
  7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results
  8. https://www.indiatoday.in/education-today/results
  9. https://www.aajtak.in/education/board-exam-results

mahresult.nic.in वर दहावीचा निकाल कसा पाहाल?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahresult.nic.in किंवा https://mahahsscboard.in वर जा.
  2. निकालाची लिंक शोधा: “SSC Examination Result 2025” किंवा “महाराष्ट्र एसएससी निकाल 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. माहिती भरा: तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव (बोर्डाच्या आवश्यकतेनुसार) प्रविष्ट करा.
  4. सबमिट करा: सर्व माहिती भरल्यानंतर “Submit” किंवा “View Result” बटणावर क्लिक करा.
  5. निकाल पाहा आणि सेव्ह करा: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो तपासा, डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंटआउट काढा.

Leave a Comment